आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावणी-सापुतारा महामार्गावर बोरगाव येथील बिरसा मुंडा चौकात गुरुवारी (दि. ९) माकपप्रणित किसान सभा व डीवायएफच्या वतीने विविध मागण्यांसाठी दोन तास रास्ता रोको करण्यात आला होता. यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी जनार्दन भोये, संदीप भोये, अशोक भोये, पुंडलिक भोये यांनी मार्गदर्शन केले. खडकी येथील सबस्टेशनवरून सुरळीत वीजपुरवठा करावा, वन दावेदारांना फॉरेस्टकडून होणारा त्रास बंद करावा, वन कायद्याची अंमलबजावणी करावी, बोरगाव व हट्टी गणातील रस्त्यांची त्वरीत दुरुस्ती करावी आदी मागण्या करण्यात आल्या होत्या.
यावेळी महावितरण अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिले. जिल्हा परिषदेचे उपविभागीय अभियंता नंदलाल सोनवणे, पीडब्ल्यूडीचे हर्षल पाटील, नायब तहसीलदार लक्ष्मण कुवर, निवडणूक नायब तहसीलदार राजेंद्र मोरे यांनी तोंडी आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला. वनविभागाचे अधिकारी उपस्थित नसल्याने तहसील कार्यालयात वनअधिकारी व किसान सभेचे शिष्टमंडळाची लवकरच बैठक घेण्यात येणार आहे. आंदोलनात धर्मा पवार, सोमनाथ गायकवाड, भारती बागूल, दिगंबर भोये, कृष्णा गायकवाड, मधुकर पवार, रामचंद्र गांगुर्डे, हरी कडाळे, नामदेव भोये, एकनाथ गवळी, सुरेश गाढवे, प्रभाकर भोये सहभागी झाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.