आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकांमध्ये गर्दी:तीन दिवसांच्या सुटीनंतर बँकांमध्ये गर्दी; असल्याने आर्थिक व्यवहार बंद पूर्ण करण्यासाठी दिवसभर ग्राहकांची गर्दी

मनमाड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गत सप्ताहात मार्चअखेर, त्यानंतर सलग लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे राष्ट्रीयीकृत बँका तीन दिवस बंद होत्या. त्यामुळे सोमवारी आणि मंगळवार दोन्ही दिवस आर्थिक व्यवहारासाठी शहरातील विविध राष्ट्रीयकृत बँकाच्या बाहेर ग्राहकांची भर उन्हात रांगा लागल्या होत्या. त्यामुळे सर्वच बँकांचे कामकाज सध्या हाउसफुल्ल असल्याचे चित्र दिसून येत आहे.

गुरुवारी (दि. ३१) असल्याने आर्थिक व्यवहार बंद पूर्ण करण्यासाठी दिवसभर ग्राहकांची गर्दी दिसून आली. शुक्रवारी १ एप्रिल रोजी बँक क्लोजिंग डेमुळे आर्थिक व्यवहार बंद होते. शनिवारी गुढीपाढव्यानिमित्त आणि रविवारी साप्ताहिक सुटीमुळे बँका बंद होत्या. सोमवारपासून बँका सुरू झाल्या आणि सोमवारी पहिल्याच दिवशी सर्व बँकांमध्ये ग्राहकांची तुंबळ गर्दी उसळली. बँक परिसरात आर्थिक व्यवहारासाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या. मंगळवारीही हेच चित्र दिसून आले.

मनमाड हे चाकरमान्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. त्यामुळे येथे १ ते १५ तारखेदरम्यान वेतन व निवृत्तिवेतन घेण्यासाठी बँकामध्ये गर्दी होते. मात्र, यंदा सलग तीन सुट्या लागून आल्याने जास्तच गर्दी झाल्याचे बँका व पोस्ट कार्यालयात दिसून आले.

बातम्या आणखी आहेत...