आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:सायकल चालवणे आरोग्यासह समाज स्वास्थ्यास हितकारक; रोहिणी भामरे यांचे प्रतिपादन

सटाणाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून सायकल चालवणे हा एक चांगला उपक्रम आहे. पर्यावरण प्रदूषण मुक्त ठेवण्यास ते उपयुक्त आहे. तसेच सायकल चालवताना कोणतेही इंधन खर्च होत नाही. म्हणूनच सायकल चालवणे आरोग्यासाठी व सामाजिक स्वास्थ्यासाठी हितकारक असल्याचे प्रतिपादन नाशिक सायकल फाउंडेशनच्या सदस्या रोहिणी भामरे यांनी केले.

चौगाव (ता. बागलाण) येथील एस. एस. फार्मवर सायकलिस्ट ग्रुपतर्फे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. बागलाण प्रेस क्लबचे अध्यक्ष अंबादास देवरे, डॉ. विशाल अहिरे, मोहन सूर्यवंशी, डॉ. विशाल खैरनार आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महेंद्र महाजन यांच्या सायकल गीताने कार्यक्रमास प्रारंभ झाला. पर्यावरण संवर्धन संरक्षणासाठी सायकल वापरास प्रोत्साहन देण्यासाठी बागलाण सायकलिस्टतर्फे बागलाण प्रगतिपथ स्वयंभू आव्हान २०२२ नावाने नागरिकांसाठी ४००, ६००, ८००, १००० किमीचे आव्हान १ ते ३१ मे दरम्यान देण्यात आले होते.

त्याचा बक्षीस वितरण सोहळा नुकताच पार पडला. पर्यावरण रक्षणासह व्यायामाची गरज व त्यातून नागरिकांची जागरूकता व्हावी, पर्यावरणाचा समतोल, वाहतूक कोंडीपासून मुक्तता, आरोग्याची काळजी आदी बाबी लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आल्याचे बागलाण सायकल समूहाचे अध्यक्ष डॉ. विशाल अहिरे यांनी प्रास्ताविकात सांगितले. यावेळी घेण्यात आलेल्या आव्हान स्पर्धेत १०० सायकलिस्टने सहभाग नोंदवला होता.

यावेळी डॉ. विशाल खैरनार, डॉ. किरण बोरसे, डॉ. किरण पवार, डॉ. अतुल जाधव, डॉ. संदीप ठाकरे, डॉ. महेंद्र कोठावदे, डॉ. रवींद्र बागुल, रविराज सोनवणे, भूषण शेवाळे, शशिकांत अहिरे, स्वप्नील लाडे, कन्हैया अहिरे, साहिल बागुल, दुर्गेश खैरनार, प्रज्ज्वल शेवाळे, शिव शेवाळे, डॉ. विशाल अहिरे, हेमंत भदाणे, मोहन सोनवणे, रवींद्र भदाणे, मोहन सूर्यवंशी, प्रशांत रौंदळ, चंद्रशेखर देवरे, योगेश भामरे, दीपक सोनवणे, मनीष येवला आदींसह सायकलिस्ट उपस्थित होते. रवींद्र भदाणे व महेंद्र महाजन यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

स्पर्धेचा निकाल ४०० किमी. : प्रथम- मोहन सूर्यवंशी, द्वितीय- शांताराम देवरे ६०० किमी. : प्रथम- रोहिणी भामरे, द्वितीय- पूनम भामरे ८०० किमी. : प्रथम- राजेंद्र सोनवणे, द्वितीय- रविराज सोनवणे १००० किमी. : प्रथम- वैभव पाटील, द्वितीय- निखिल लोहकरे १२ वर्षे खालील गट ४०० किमी : प्रथम- श्वास अहिरे, द्वितीय- मानस सोनवणे

बातम्या आणखी आहेत...