आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आश्वासन:विद्यार्थ्यांसाठी मनमाडवरून दाेन जादा बस सुरू करणार

मनमाड10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनमाडमधून अनेक विद्यार्थी चांदवड येथे शिक्षणासाठी दररोज जातात. परंतु त्यांना सोयीस्कर बस नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. याबाबत त्वरित जादा बसची व्यवस्था करण्यात यावी व चांदवड बस स्थानकात वाहतूक नियंत्रकाची तातडीने नेमणूक व्हावी, अशी मागणी शिवसेना जिल्हा उपप्रमुख संतोष बळीद व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विभागीय नियंत्रकाकडे केली. याबाबत तातडीने निर्णय घेण्यात येऊन दोन बस सुरू केल्या जातील, असे आश्वासन आगार प्रमुखांनी दिले आहे.

मनमाड येथून चांदवडला शिक्षणाकरता दररोज ५०० ते ६०० विद्यार्थी जातात. हे सर्व एसटीचे पासधारक आहेत. या विद्यार्थ्यांना चांदवड येथे जाण्यासाठी ८ ते ८.३० दरम्यान एसटी बसची व्यवस्था करण्यात यावी.

नांदगाव व नवापूर बस नाकारतात प्रवेश
नवापूर ते नांदगाव आगाराच्या चालक वाहकांना विद्यार्थी वाहतुकीची सूचना करण्यात यावी, या आगाराच्या बस पासधारक विद्यार्थ्यांना बसमध्ये प्रवेश देत नाही. चांदवड स्थानकावर सांय. ५ वाजता नियंत्रक नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होते. तेथे तातडीने वाहतूक नियंत्रणाची नेमणूक करावी, या मागण्यांचा तात्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा उद्धव ठाकरे शिवसेनेतर्फे देण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...