आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिबट्याचा बंदोबस्त करावा:शिंगवेत रोजच बिबट्याचे दर्शन ;  स्पेशल सर्च ऑपरेशन राबवून बंदोबस्ताची मागणी

सायखेडा7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

निफाड तालुक्यातील शिंगवे परिसरात रोजच ग्रामस्थांना बिबट्याचे दर्शन होत असल्याने शिवारात फिरणेही अवघड झाले आहे. दोन दिवसांपूर्वीच शिंगवे गावालगत खळवाडी परिसरात पिंटू डेर्ले यांच्या गाईचे वासरू बिबट्याने ठार केले. वनविभागाने नेहमीप्रमाणे पंचनामा केला आणि पिंजरा लावला. परंतु, अद्यापही बिबट्या जेरबंद झाला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जाेर धरू लागली आहे.

गत आठवड्यात गणपत मोगल यांच्या गाईचे वासरू बिबट्याने फस्त केले. तसेच दोन दिवसांपूर्वी शाळेतील मुले घरी परतत असताना त्यांना बिबट्याचे दर्शन झाल्याने त्यांनी आरडाआेरड करत घर गाठले. परिणामी वस्तीवरील मुले शाळेत येण्यास घाबरत आहेत. सध्या शेतात निंदणीचे काम सुरू असून शेतकऱ्यांना व शेतमजुरांना जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे. त्यामुळे वनविभागाने या परिसरात स्पेशल सर्च ऑपरेशन राबवून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी हाेत आहे. शिंगवे परिसरातील शेतवस्तीवर आणि माळवाडी भागात करंजगाव सबस्टेशनमधून रात्रीचा सिंगलफेजचा पुरवठा होतो. ताे निदान पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा व्हावा अशी मागणी हाेत आहे.

बातम्या आणखी आहेत...