आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐवज लांबवला:सुळेवाडीत दिवसा घरफोडी, 3 लाखांचा ऐवज लांबवला

सिन्नरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील सुळेवाडी येथे अज्ञात चोरट्यांनी मंगळवारी (दि. १) दुपारी भरदिवसा घरफोडी करून घरातील दोन लाखांच्या रोकडसह दीड तोळे सोन्याचा नेकलेस घेऊन पोबारा केला. नांदूरशिंगोटे येथेही अशाचप्रकारे सोमवारी दुपारी दोन ठिकाणी घरफोडी झाली होती. सध्या रब्बी हंगाम उभारणीचे काम सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या घरांना दुपारी कुलूप रहात असल्याने चोरट्यांनी चोरीची वेळही बदलली आहे.

सुळेवाडी येथील प्रभाकर बळवंत शिरसाठ (४८) यांचे गावातील जिल्हा परिषद शाळेजवळ देशवंडी रस्त्याला घर आहे. मंगळवारी त्यांच्या घरातील सर्व सदस्य कांदा लागवडीसाठी शेतात गेले होते. त्यांचा मुलगा किरण हा गावातील नातलगांच्या वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमाला गेला असल्याने घरी कुलूप होते. दुपारी अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत कपाटात ठेवलेले रोख २ लाख रुपये व दीड तोळे सोन्याचा नेकलेस घेऊन पोबारा केला. किरण हा माळेगाव एमआयडीसी कारखान्यात नोकरीला असून दुपारच्या ड्यूटीवर जाण्यापूर्वी सव्वादोन वाजेच्या सुमारास तो घरी आला.

त्यावेळी घराचे कुलूप तुटलेले पाहून त्याला संशय आला. घरातील कपाटातून चोरट्यांनी रोख रकमेसह दीड तोळे सोन्याचा नेकलेस चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी शिरसाठ यांनी एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिली. सहायक पोलिस निरीक्षक पवार, पोलिस कर्मचारी बागुल यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम एमआयडीसी पोलिस ठाण्यात सुरू होते.

बातम्या आणखी आहेत...