आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:पदवी प्रमाणपत्रासाठी 16 फेब्रुवारीपर्यंत‎ अर्ज करण्यासाठीची अंतिम मुदत‎

नाशिक‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा १२२‎ व्या पदवीप्रदान समारंभासाठी पदवी‎ प्रमाणपत्र प्राप्त करू इच्छिणाऱ्या‎ विद्यार्थ्यांनी पदवी किंवा पदविका‎ प्रमाणपत्रासाठी १६ फेब्रुवारीपर्यंत अर्ज‎ करण्याचे आवाहन सावित्रीबाई फुले‎ पुणे विद्यापीठाने केले आहे.‎ एप्रिल व मे २०२२ मध्ये उत्तीर्ण‎ झालेल्या विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यात‎ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे, असे‎ आवाहन परीक्षा प्रमाणपत्र‎ विभागाकडून करण्यात आले आहे.‎

विलंब शुल्कासह अर्ज करण्याची मुदत‎ ही १७ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी पर्यंत‎ असणार आहे. पदवी किंवा पदविका‎ प्रमाणपत्र मिळविण्याकरिता‎ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज‎ योग्य शुल्कासह भरल्यानंतर अंतिम‎ वर्षाच्या गुणपत्रिकेची छायांकित प्रत‎ अपलोड करणे आवश्यक आहे.‎ सविस्तर माहिती विद्यापीठाच्या‎ संकेतस्थळावरील‎ convocation.unipune. ac.in‎ या लिंकवर उपलब्ध आहे.‎

बातम्या आणखी आहेत...