आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यालयात ठिय्या:सर्वांसाठी घरे योजनेत दिरंगाई, नगरपरिषद कार्यालयात ठिय्या

मनमाडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र,राज्य शासन व नगर परिषदेतर्फे राबवण्यात येत असलेल्या सर्वांसाठी घरे योजनेनुसार अतिक्रमित राहत्या घराचा सातबारा उतारा मिळावा यासह विविध मागण्यांसाठी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासाच्या वतीने नगरपरीषद कार्यालयाच्या प्रांगणात ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर घोषणाबाजी करीत प्रशासन अधिकारी अशोक पाईक यांना निवेदन दिले.

भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासाचे अध्यक्ष भीमराज लोखंडे, कादिर शेख, कय्याम सय्यद, कैलास शिंदे आदींच्या उपस्थितीत बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. ‘घर आमच्या हक्काचे नाही, कोणाच्या बापाचे’, ‘प्रशासनाचे करायचे काय..खाली डोके वर पाय ’आदी घोषणांनी नगर परिषद कार्यालय दणाणून गेले होते.

सर्वांसाठी घरे २०२२ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासन नियुक्त समितीची स्थानिक स्तरावर बैठक घ्यावी, त्यात लाभार्थ्यांचे प्रतिनिधींना बोलवावे, वॉर्ड क्रमांक १२ व १३ मधील सर्वे नंबर २७७ व २७८ चे ड्रोन सर्वे करून मोजणी करावी, आदिवासी लाभार्थ्यांना या पूर्वी दिलेल्या घराचे सातबारा उतारे या योजनेअंतर्गत देण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या. त्या मान्य होत नाही तोपर्यंत बेमुदत ठिय्या आंदोलन करणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले. आंदोलनात बाळासाहेब दौंडे, कादीर शेख, विष्णू चव्हाण, कयाम सैय्यद, रमेश दरगुडे, दीपक दरगुडे, कैलास शिंदे, चंद्रकांत जाधव, सुनील महाले, फिरोज शेख, सचिन दरगुडे, संतोष सोनवणे,सद्दाम अत्तार, मच्छिंद्र दरगुडे, शरद दरगुडे, न्यानेशवर दरगुडे,शैला बागुल, मंदा मंडळ, आरती शर्मा, इंदुबाई अहिरे, ताराबाई जाधव, मंगल शिंदे, शकुंतला लोखंडे, शीतल जाधव, तारा बाई शिंदे, पुष्पा कडनूर, नम्रता कुलकर्णी आदी अतिक्रमण धारक लाभार्थी सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...