आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेवला, नांदगाव व मालेगाव तालुक्यात खरीप कापूस लागवड क्षेत्रात विक्रमी वाढ होण्याचा अंदाज असून कृषी विभागाने राज्य शासन मान्यता प्राप्त बीटी -२कापूस बियानेच्या एकूण एक लाख ३९,६८५ पाकिटांची मागणी नोंदवली आहे. बुधवारपासून (दि.१जून) बीटी कापूस बियाणे विक्रीवरील बंदी उठवण्यात आली असून बाजरात ८२ हजार १२३ बीटी -२ पाकीट बियाणे विक्रीला उपलब्ध झाले आहेत.तर एचटीबीटी बियाणेवर बंदी कायम असून या बियानेची विक्री आढळून आल्यास कारवाईचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत.
पाच वर्षांपासून मालेगाव, येवला, नांदगाव या तालुक्यात कापूस लागवडीत वाढ होत आहे. कापसाला असणारी मागणी, मिळणारा बाजारभाव व उत्पादनासाठी असलेले वातावरण यामुळे शेतकरी या पिकाकडे वळत आहेत.चालू खरीप हंगामात मृगाचा जोरदार पाऊस झाला तर कापूस लागवड अंदाजपेक्षाही अधिक होण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.त्या दृष्टीने कृषी विभागाने बीटी२ कापूस बियाणे पाकिटांची मागणी नोंदवली आहे. एप्रिल , मे महिन्यात शेतकऱ्यांनी कापूस लागवड टाळून गुलाबी बोण्ड अळीची साखळी तुटावी या उद्देशाने राज्य शासनाने मे अखेर पर्यंत कापूस बियाणे विक्रीवर बंदी घातली होती.१ जूनपासून बंदी उठवण्यात आली असून जिल्ह्यातील कापूस लागवड क्षेत्रातील तालुक्यांमध्ये बियाणे विक्रीला उपलब्ध झाले आहे.
बेकायदा बियाणे विक्रेत्यांवर कारवाई
एचटीबीटी कापूस बियानेवर बंदी आहे.याची कुठे विक्री आढळून आल्यास कृषी विभागाला माहिती द्यावी, माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवलं जाईल.बेकायदा विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करू.
-दिलीप देवरे, विभागीय कृषी अधिकारी
दर निश्चित
प्रति ४७५ ग्रॅमचे बीटी-२ कापूस बियाणे पाकिटे विक्रीला आहेत.कोणत्याही कंपनीचे बियाणे पाकीट घेतले तरी ८१० रुपये पाकीट असे दर शासनाने निश्चित केले आहेत. फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना पक्की बिले घ्यावीत.
- बाळासाहेब शिरसाठ, कृषीतज्ज्ञ व बीटी-२ बियाणे वितरक
‘या’कंपन्यांची बियाणे बाजारात
निजीविडू, टाटा रॅलीज, महानंदी, कोहिनूर, महाबुंद, कलश, राशी, प्रभात, महिको, कावेरी, अजित, पंचगंगा, रामा, सत्या या बियाणे कंपन्यांचे बीटी-२ चे विविध वाण बाजारात आले आहेत.
तालुकानिहाय बियाणे पाकिटांची मागणी
तालुका मागणी उपलब्ध पाकिटे
मालेगाव ८९००० ७०९००
नांदगाव ३१००० १७५००
येवला १९६०५ १३७२३
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.