आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:दाभाडीत कँडल मार्च काढून पंकजच्या मारेकऱ्यांच्या अटकेची मागणी; आठ दिवसांनी तीव्र आंदोलनाचा इशार

मालेगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या आठवड्यात दाभाडी येथे पंकज सुभाष मानकर (२४) या तरुणाचा खून झाला होता. त्याचे मारेकरी अद्याप मोकाट असल्याने ग्रामस्थांनी मंगळवारी रात्री कँडल मार्च काढून मारेकऱ्यांच्या अटकेची मागणी केली. आठ दिवसांत पोलिसांनी मारेकऱ्यांना अटक न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.

मयत पंकज हा वाहनचालक होता. तो वाहनाने भाडोत्री वाहतूक करण्याचे काम करत होता. गेल्या शनिवारी पंकज घरातून कामानिमित्ताने बाहेर पडला होता. यानंतर रविवारी सकाळी पावणेअकरा वाजेच्या सुमारास त्याचा मृतदेह गरबड गावाजवळील पळाशी शिवारात बोरी नदीपात्राच्या कडेला आढळून आला. मारेकऱ्यांनी पंकजला निर्दयी पद्धतीने पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह बोरी नदीपात्रात कडेला टाकून दिला होता.

या घटनेस आठवडा उलटूनही खुनाचा उलगडा करण्यात पोलिस प्रशासन अपयशी ठरले आहे. पोलिसांनी लवकरात लवकर या हत्या प्रकरणातील आरोपींचा शोध घेत त्यांना शिक्षा करावी, या मागणीसाठी ग्रामस्थ व मित्रपरिवाराच्या वतीने कँडल मार्च काढला. मृत पंकज याच्या घरापासून सुरू झालेल्या कँडल मार्चचा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ समारोप करण्यात आला. पंकजला श्रद्धांजली वाहून मारेकऱ्यांच्या अटकेची जोरदार मागणी करण्यात आली.

यावेळी विशाल गोसावी, अमोल निकम, प्रमोद निकम, शिवाजी मानकर, नीळकंठ निकम, वैभव मानकर यांनी मनोगत व्यक्त केले. मार्चमध्ये महिला, युवक व ग्रामस्थ सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...