आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन‎:बजरंगवाडी भागातील देशी दारू‎ दुकान बंद करण्याची मागणी‎

मालेगाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराच्या बजरंगवाडीतील देशीदारू दुकान‎ बंद करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.‎ काँग्रेसचे शहराध्यक्ष एजाज बेग यांच्या‎ नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने साेमवारी दुपारी‎ महसूल प्रांताधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.‎ पूर्वी सदर दुकान हे शहरापासून लांब‎ अंतरावर येत हाेते. मात्र, हद्दवाढीमुळे दुकान‎ मनपा क्षेत्रात समाविष्ट झाले आहे.‎ दुकानाच्या आजूबाजुला माेठी नागरी वस्ती‎ तयार झाली आहे.

येथील रहिवाशांना दारू‎ दुकानाचा त्रास हाेत आहे. मद्यपी व्यक्तींमुळे‎ या भागातून जाणाऱ्या महिलांची कुचंबणा‎ हाेत असते. बरेच तरुण दारूच्या अधीन गेले‎ आहेत. धार्मिकस्थळांमुळे दारू दुकानाचे‎ इतरत्र स्थलांतर हाेणे आवश्यक आहे.‎ प्रशासकीय यंत्रणेने मागणीचा विचार करून‎ दुकानाचे स्थलांतर करावे किंवा दुकान‎ कायमस्वरूपी बंद करावे. मागणीनुसार‎ कार्यवाही न केल्यास आंदाेलन छेडण्याचा‎ इशाराही बेग यांनी दिला आहे. मागणीचे‎ निवेदन नायब तहसीलदार धनंजय लचके‎ यांनी स्वीकारले. निवेदन देताना जैनूल‎ पठाण, अब्दुल गफ्फार, माेहंमद हाशिम‎ अन्सारी, मुख्तार अहमद आदी उपस्थित‎ हाेते.‎

बातम्या आणखी आहेत...