आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुढीसाठी पैठणी:वीन वर्षाच्या गुढीसाठी पैठणी वस्त्राला मागणी; वस्त्र विणकराने प्रथमच गुढीसाठी तयार केली पैठणी

येवला5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगप्रसिद्ध पैठणीवर नेहमीच पैठणी विणकरांनी विविध कला साकारल्या आहेत. मात्र, या वेळेस गुढीपाडवा सणानिमित्त गुढीला जे वस्त्र लागतात ते पैठणी वस्त्र एका कारागिराने तयार केले आहे. विविध प्रकारच्या डिझाइनचे पैठणी वस्त्र तयार केले असून या वस्त्रांना शहरासह, राज्यभरातून मागणी होऊ लागली आहे.

हिंदू धर्मात घरोघरी आपल्या दारी गुढी उभारून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. या गुढीसाठी नवीन वस्त्र वापरले जाते. आता या गुढींना आकर्षकरित्या सजविण्यासाठी शहरातील विणकराने खास पैठणी वस्त्र तयार केले आहे.

या पैठणी वस्त्रांमध्येही अनेक प्रकारच्या डिझाइन्स साकारल्या आहेत. महिला हे पैठणी वस्त्र गुढी उभारण्यासाठी खरेदी करताना दिसत आहे.

बातम्या आणखी आहेत...