आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू आक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यात लव्ह जिहादला विरोध, धर्मांतरबंदी कायद्याची मागणी करण्यात आली. विविध संघटनांसह दोन हजारावर नागरिक सहभागी झाले होते.विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यासह विविध पक्षांचे व संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते भगव्या टोप्या घालून सहभागी झाले होते. वंदे मातरम्, भारतमाता की जय, जय श्रीराम आदींसह विविध घोषणांनी सिन्नर शहरातील रस्ते दुमदुमून गेले. बसस्थानकापासून मोर्चाला सुरुवात झाली. सरस्वती पूल, गणेश पेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौकमार्गे मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचला. तेथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले.
भाजपचे जयंत आव्हाड यांनी आफताबला फाशी देण्याची मागणी केली. दिल्लीत लव्ह जिहादचा संतापजनक प्रकार घडला आहे. शरीराचे ३५ तुकडे करण्यापर्यंत क्राैर्याची सीमा गाठली आहे. अशा अनेक हिंदूविरोधी गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी हा मोर्चा असल्याचे सांगितले. निशा पाटील यांनी मार्गदर्शन केले. उपविभागीय अधिकारी अर्चना पठारे, तहसीलदार एकनाथ बंगाळे, पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
लव्ह जिहादचे हजारो प्रकरणे उघडकीस येत आहेत. हिंदू धर्मातील हजारो मुलींना जाणीवपूर्वक प्रेमाच्या जाळ्यात अडकवले जात असून शेकडो मुलींची हत्या झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. हे प्रकार बक्षिसे देऊन घडवून आणले जात आहेत. आफताबने निर्घृणपणे खून केल्याने फाशीची शिक्षा लवकरात लवकर द्यावी, लव्ह जिहाद आणि धर्मांतरबंदी कायदा राज्यासह देशभरात लागू करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.