आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन‎:निमाेण ते गिडगेवस्ती रस्ता‎ दुरुस्त करण्याची मागणी‎

मालेगाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चांदवड तालुक्यातील निमाेण –‎ गिडगे वस्ती तसेच दहेगाव‎ दरम्यानचा रस्ता डांबरीकरण‎ करण्याची मागणी सरपंच डाॅ. स्वाती‎ देवरे यांनी केली अाहे. रविवारी पूर्व‎ भागाच्या दाैऱ्यावर आलेल्या‎ आमदार डाॅ. राहुल आहेर यांना‎ मागणीचे निवेदन देण्यात आले.‎ गिडगे वस्ती व दहेगाव शिवारात‎ माेठ्या प्रमाणावर नागरिक‎ वास्तव्यास आहेत. दैनंदिन‎ कामकाजासाठी या नागरिकांना‎ सदर रस्त्यांचा वापर करावा लागताे.‎ मात्र, पावसामुळे रस्त्याची दयनीय‎ अवस्था झाली आहे. शेतकऱ्यांना‎ आपला शेतमाल बाजार‎ समितीपर्यंत नेण्यासाठी खराब‎ रस्त्यामुळे गैरसाेय हाेत आहे.‎

निमाेण ते दहेगाव रस्ता अवघा‎ साडेतीन तर गिडगेवस्ती रस्ता तीन‎ किलाेमीटरचा आहे. सदर रस्त्यांची‎ दुरुस्ती झाल्यास नागरिकांना माेठा‎ दिलासा मिळेल. रस्ता दुरुस्ती‎ कामासाठी निधी उपलब्ध करुन‎ मंजुरी मिळवून द्यावी, अशी मागणी‎ करण्यात आली. दाेन्ही रस्त्यांची‎ काम मार्गी लावण्याचे आमदार डाॅ.‎ आहेर यांनी आश्वासन दिले.‎ यावेळी डाॅ. भाऊराव देवरे,‎ उपसरपंच हनुमान दखणे,‎ साेसायटीचे अध्यक्ष दत्तात्रय‎ साेनवणे, रतन दखणे, हिरामण‎ देवरे, वाल्मीक देवरे, दादाजी देवरे,‎ मनाेज शिंदे आदी उपस्थित हाेते.‎

बातम्या आणखी आहेत...