आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील कृषी उत्पन्न बाजार समितीत दैनंदिन कांदा लिलावाची वेळ ही सकाळी ९ वाजेची करण्यात यावी, कांदा विक्री नंतर शेतकऱ्यांना तत्काळ रोख स्वरूपात पैसे अदा करावेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली आहे. याबाबत उपसचिव आर. एन. जाधव याना मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी सोमनाथ पवार, ज्ञानदेव सानप, सीताराम आव्हाड, विकास शिंदे, गोविंद सोनवणे, नामदेव आव्हाड, ज्ञानेश्वर देवकर, सुनील केदार आदींसह शेतकरी उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये सकाळी ९ वाजता कांद्याचे लिलाव सुरू होतात. परंतु सिन्नर बाजार समितीत याबाबत मनमानी आहे. कधी सकाळी ११, कधी १२ तर कधी दुपारी २ वाजता कांद्याचे लिलाव होतात. त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागताे. त्यांचा संपूर्ण दिवसच वाया जातो, असे निवेदनात म्हटले आहे. बहुतांश व्यापारी रोख पैसे देण्याऐवजी शेतकऱ्यांना पुढील तारखेचा धनादेश देतात.
यामुळे तालुक्यातील असंख्य कांदा उत्पादक शेतकरी सिन्नर बाजार समितीत कांदा विक्री न करता सायखेडा, विंचूर, निफाड, पिंपळगाव बसवंत, लासलगाव या बाजार समितीत कांदा घेऊन जातात. तालुक्यातील शेतकरी इतर तालुक्यात कांदा विक्रीसाठी जात असल्याने बाजार समितीसह सिन्नरच्या बाजारपेठेवरही याचा विपरीत परिणाम होतो. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी बाजार समितीत लिलावाची वेळ सकाळी ९ वाजेची करून १०० टक्के कांदा विक्रीचे पैसे रोख स्वरूपात देण्याची पद्धत सुरू करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक दिघोळे यांनी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.