आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी अवजारांचे प्रदर्शन आयोजित:चांदवडला कृषीमार्फत अवजारांचे प्रदर्शन

चांदवडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कृषी विभागामार्फत कृषी यांत्रिकीकरण या योजनेची व्यापक प्रमाणात प्रचार व प्रसिद्धी होण्यासाठी येथील प्रशासकीय इमारत येथे कृषी अवजारांचे प्रदर्शन आयोजित केले होते.महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा वर्षभर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यासाठी तालुक्यातील शेतकरी बांधवांनी कृषी यांत्रिकीकरण या योजनेअंतर्गत अवजारे व ट्रॅक्टरसाठी ऑनलाइन अर्ज करण्याच्या हेतूने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.

या प्रदर्शनात ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित अवजारे मल्टी क्रॉप थ्रेशर, रिपर, पेरणी यंत्र, रोटावेटर, स्प्रेयर, पॉवर टिलर, ट्रॉली आदी अवजारांचा समावेश होता. यावेळी शेतकऱ्यांना अवजारांबद्दल माहिती व अनुदान तसेच ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे, सोडतीमध्ये निवड झाल्यानंतर लागणारी कागदपत्रे याबद्दलची माहिती देण्यात आली. या प्रदर्शनप्रसंगी प्रकल्प संचालक (आत्मा) राजेंद्र निकम, तंत्र अधिकारी वरुण पाटील, नोडल ऑफिसर भटू पाटील आदी उपस्थित होते. यशस्वितेसाठी मंडळ कृषी अधिकारी मनीषा जाधव व कृषी पर्यवेक्षक आर. पी. पाटील यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...