आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खऱ्या आराेपींच्या अटकेची मागणी:मालेगाव बाॅम्बस्फाेटातील संशयितांच्या अटकेच्या मागणीसाठी निदर्शने

मालेगाव23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बडा कब्रस्तान बाॅम्बस्फाेट प्रकरणातील मुख्य संशयितांच्या अटकेची मागणी करत साेशल डेमाेक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. बडा कब्रस्तानसमाेर हातात फलक घेत जाेरदार घाेषणाबाजी केली.शहरात ८ सप्टेंबर २००६ मध्ये साखळी बाॅम्बस्फाेट झाले हाेते. या घटनेस १६ वर्ष पूर्ण झाल्याने एसडीपीआयने बाॅम्बस्फाेटाचा निषेध करत खऱ्या आराेपींच्या अटकेची मागणी केली.

या बाॅम्बस्फाेटात निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. देशभरात हैदराबाद मक्का मशिद, अजमेर दर्गा, समझाैता एक्स्प्रेसमध्ये बाॅम्बस्फाेट झाले. या बाॅम्बस्फाेटांमागे जातीयवादी शक्तींचा हात आहे. राजकीय फायद्यासाठी असे कृत्य घडविले गेले आहेत. यशवंत शिंदे यांच्या उघड आराेपांमुळे अशा संघटनांचे चेहरे समाेर आल्याचे पार्टीचे अध्यक्ष राहिल हनीफ यांनी सांगितले. बाॅम्बस्फाेट घडविणाऱ्या खऱ्या गुन्हेगारांना अटक करून फाशीची शिक्षा द्यावी. संबंध नसताना या प्रकरणात गाेवल्या गेलेल्या मुस्लिम तरुणांना भरपाई देण्याची मागणी केली. याप्रसंगी सरचिटणीस इब्राहिम इंकलाबी, अब्दुल्ला इंजिनियर, मुश्ताक अहमद आदी उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...