आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:‘आम्ही मालेगावकर’ची निदर्शने‎; अपर जिल्हाधिकाऱ्यांना‎ दिले निवेदन‎

मालेगाव9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्व शासकीय व निमशासकीय‎ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन याेजना‎ लागू करण्याची मागणी आम्ही‎ मालेगावकर विधायक संघर्ष‎ समितीने केली आहे. समिती‎ पदाधिकाऱ्यांनी साेमवारी दुपारी‎ अपर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर‎ निदर्शने करत मागणीला पाठिंबा‎ दर्शवून प्रशासनाला निवेदन सादर‎ केले.‎ गेल्या अनेक वर्षांपासून जुनी‎ पेन्शन याेजनेसाठी कर्मचाऱ्यांची‎ आंदाेलने हाेत आहेत. आता‎ मंगळवारपासून याच मागणीसाठी‎ बेमुदत संपाचे हत्यार उपसण्यात‎‎‎‎‎‎‎‎‎ आले आहे. जुनी पेन्शन याेजना‎ कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर एक‎ शाश्वत आधार देत हाेती.

पगाराच्या‎ निम्मी रक्कम पेन्शन म्हणून मिळत‎ हाेती, दर सहा महिन्यांनी महागाई‎ भत्ता दिला जात हाेता. त्यामुळे‎ सेवानिवृत्तीनंतरही कर्मचारी आपले‎ जीवन आनंदाचे जगत हाेते.

इतर‎ राज्यांमध्ये जुनी पेन्शन याेजना लागू‎ असताना महाराष्ट्रात मात्र,‎ कर्मचाऱ्यांवर अन्याय हाेत आहे.‎ सरकारने सदर पेन्शन याेजना कायम‎‎‎‎‎‎‎‎‎ ठेवत राेजंदारी कर्मचाऱ्यांना किमान‎ वेतन लागू करण्याची जाेरदार‎ मागणी करण्यात आली.अव्वल‎ कारकून लक्ष्मण परळीकर यांना‎ यांना मागणीचे निवेदन देण्यात‎ आले. निवेदन देताना समितीचे‎ निखिल पवार, सुशांत कुलकर्णी,‎ अरुण गाडे, एस. टी. गायकवाड,‎ नानासाहेब पटाईत, प्रवीण चाैधरी,‎ शंकर खैरनार, माेहन कांबळे, दादा‎ बहिरम, प्रा. अनिल निकम, अनिल‎ पाटील आदी उपस्थित हाेते.‎

बातम्या आणखी आहेत...