आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राेष:अखंडित वीजपुरवठ्याविरोधात देवपूरकरांचा उपकेंद्रावर मोर्चा ; भारनियमन बंद करण्याचा निर्णय

सिन्नरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देवपूर उपकेंद्राला जोडलेल्या अतिरिक्त निमगाव फीडरमुळे परिसरात अखंडित वीजपुरवठा होत नसल्याच्या निषेधार्थ देवपूर येथील शेतकऱ्यांनी उपकेंद्राच्या कार्यालयावर मोर्चा काढून अधिकाऱ्यांना जाब विचारला. शेतकऱ्यांना अखंडित वीजपुरवठा करावा, अतिरिक्त जोडलेले निमगाव फीडर त्वरित काढून टाकावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. त्यावर अतिरिक्त फीडर काढून टाकण्याचे आश्वासन येथील कनिष्ठ अभियंता वैभव पवार यांनी आंदोलकांना दिले. याशिवाय एकावेळी सर्व फीडरला वीजपुरवठा न करता टप्प्याटप्प्याने प्रत्येकी पाच तास अखंडित वीजपुरवठा करण्याचे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले. त्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.‌

देवपूर परिसरात शेतीसाठी करण्यात येणारा थ्री फेज वीजपुरवठ्यात सातत्याने अडचणी येत असल्याने शेतकरी त्रस्त आहेत. गेल्या तीन आठवड्यांपासून ही समस्या भेडसावत असल्याने आणि रब्बी पिकांची भरणी

निमगाव फीडर वाऱ्यावर निमगाव फीडर यापूर्वी निफाड तालुक्यातील म्हाळसाकोरे येथून जोडण्यात आले होते. मात्र, तेथून या फीडरचा वीजपुरवठा वारंवार खंडित केला जातो. याच फीडरवर असलेले गुळवंच गाव सिंगल फेज असल्याने तेथे अखंडित वीजपुरवठा आवश्यक आहे. त्यामुळे ते देवपूर उपकेंद्राला जोडण्यात येते. त्याचा अतिरिक्त भार या केंद्रावर पडत असल्याने शेतकऱ्यांची अडचण होत आहे.

एका फीडरला केवळ ५ तास वीज देवपूर उपकेंद्राला १९ फीडर जोडले आहेत. एकाचवेळी सर्व फीडरला पूर्ण दाबाने वीजपुरवठा करताना वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. शहा उपकेंद्र सुरू होईपर्यंत ही समस्या कायम राहणार आहे. मात्र, सध्या प्रत्येक फीडरसाठी पाच तास वीजपुरवठा याप्रमाणे वेळापत्रक तयार केले असून त्यानुसार वीजपुरवठा सुरळीत होण्याची अपेक्षा आहे. वैभव पवार, कनिष्ठ अभियंता, देवपूर उपकेंद्र

बातम्या आणखी आहेत...