आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निराेप:गौरींबरोबरच पाच दिवसांच्या गणरायाला भक्तिभावाने निराेप

मनमाडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गौरींना सोमवारी भावपूर्ण निरोप देण्यात आला. बुधवारी घरोघरी गणेश स्थापनेनंतर शनिवारी ज्येष्ठा गौरींचे आगमन झाले. आनंद आणि समाधान देणाऱ्या या सणामुळे घरोघरी उत्साहाचे वातावरण होते.

गौरींच्या सजावटीबरोबरच सामाजिक आशय असलेले देखावे यंदा अनेक घरांमध्ये साकारण्यात आले हाेते. सायंकाळी महिलांच्या हळदी-कुंकवाचाही कार्यक्रम झाला. गौरींची खणानारळाने ओटी भरण्यात आली. तर सोमवारी गौरींना भक्तिभावाने निरोप देण्यात आला. अनेक घरांमध्ये पाच दिवसांच्या गणेशोत्सवाची परंपरा आहे. त्यामुळे सायंकाळी गौरींबरोबरच गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...