आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संताप व्यक्त:धानोरेकारांची वाट बिकट; आंदोलन छेडण्याचा चित्रा कांबळे यांचा इशारा

येवला14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील बाभूळगाव येथून धानोरे -सावरगावकडे जाणाऱ्या वाटेची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. सदर रस्त्याची तातडीने दुरुस्ती व्हावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाटगाव ग्रामपंचायत सदस्य तथा क्रांतिगुरू सोशल फाउंडेशनच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा कांबळे यांनी दिला आहे.

धानोऱ्याहून सावरगावकडे जाणारा रस्ता पावसामुळे व जड वाहतुकीमुळे अत्यंत खराब झालेला असून सदर रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे. धानोरे या गावी जाण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे. सदर रस्त्यामध्ये जागोजागी गुडघ्यापर्यंत खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह महिला व वृद्धांचे अतोनात हाल होत आहेत. शासन प्रतिनिधी तथा प्रशासकीय अधिकारी जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत असल्याने संताप व्यक्त हाेत आहे.

बातम्या आणखी आहेत...