आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानिफाड तालुक्यातील खेरवाडी परिसरात सायखेडा पाेलिसांनी पाठलाग करून एका डिझेल चाेरट्याला ताब्यात घेतले असून त्याचा साथीदार फरार हाेण्यात यशस्वी झाला. ताब्यात घेतलेल्या संशयितांकडून पाेलिसांनी कारसह ३०० लिटर डिझेल असा सुमारे चार लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मंगळवारी पहाटे सायखेडा पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक पी. वाय. कादरी गस्त घालत असताना त्यांना खेरवाडी परिसरातून एक संशयास्पद कार वेगाने जात असल्याची माहिती मिळाली. ते गाडीचा शाेध घेत असतानाच एक कार वेगाने जाताना दिसली.
पाेलिसांनी कारचा पाठलाग सुरू केला. काही अंतरावर संशयास्पद कार वेगामुळे वळणावर घसरली. यावेळी पाेलिसांनी त्वरित कारजवळ पाेहाेचत कारमधील संशयित सागर दत्तात्रय गरड (३०, रा. पंचकृष्ण लॉन्सच्या पाठीमागे, कोणार्कनगर-२, नाशिक) यास शिताफीने पकडले, मात्र त्याचा साथीदार अंधाराचा फायदा घेत फरार. पोलिसांनी दाेन लाख ७० हजार रुपये किमतीचे ३०० लिटर डिझेल, कार (एमएच ०१ एनए ४८४१३) असा सुमारे चार लाख २३ हजार रुपयांचा एेवज जप्त केला आहे. फरार संशयितांचा शोध सुरू असून तपास सुरू आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.