आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्तगट तपासणी‎:दिघवद जि. प. शाळेत 130  विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी‎

चांदवड‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील कला, वाणिज्य व विज्ञान‎ महाविद्यालयातील डीएमएलटी‎ विभाग व दिघवद जिल्हा परिषद‎ प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त‎ विद्यमाने तालुक्यातील दिघवद‎ येथील जिल्हा परिषद प्राथमिक‎ शाळेत विद्यार्थ्यांचे मोफत आरोग्य‎ तपासणी शिबिर पार‎ पडले.

शिबिराच्या अध्यक्षस्थानी‎ सरपंच वाल्याबाई पवार उपस्थित‎ होत्या. यावेळी चांदवड येथील‎ विज्ञान महाविद्यालयाचे उपप्राचार्य‎ डॉ. मनोज पाटील यांनी‎ आरोग्यविषयक माहिती सांगून रक्त‎ तपासणी शिबिराचे महत्त्व विशद‎ केले. यावेळी १३० विद्यार्थ्यांचे‎ हिमोग्लोबीन व रक्तगटांची तपासणी‎ करण्यात आली.‎

शिबिरासाठी उपसरपंच सुरेखा‎ आहेर, शाळा व्यवस्थापन समिती‎ उपाध्यक्ष किरण मापारी यांनी‎ सहकार्य केले. शिबिर‎ यशस्वितेसाठी प्रा. गौतम गांगुर्डे,‎ रवींद्र वाघ, सुभाष गरुड,‎ मुख्याध्यापक अलका बोरसे,‎ संगीता महाले, प्रकाश बंजारा,‎ प्रवीण गांगुर्डे, रेवन गांगुर्डे, सुखदेव‎ आहेर यांनी परिश्रम घेतले.‎ शिबिराचे नियोजन व सूत्रसंचालन‎ शांताराम हांडगे यांनी केले.‎

बातम्या आणखी आहेत...