आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालेगाव:शिवसंग्राम संघटनेच्या तालुकास्तरीय बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा

मालेगावएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील शासकीय विश्रामगृहामध्ये शिवसंग्राम संघटनेच्या वतीने तालुकास्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला शिवसंग्राम संघटनेचे श्याम काबरा, जिल्हाध्यक्ष गजानन इढोळे, ग्रा.पं. सदस्य सुधाकर धोंगडे, शिवसंग्राम संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे, विधानसभा अध्यक्ष गजानन बाजड, स्वप्नील वाघ, केशवराव जाधव, गोपाल बोरकर, मोहन तायडे, मनोज मुंडे, गोपाल सातपुते हे उपस्थित होते.

यावेळी मालेगाव तालुका युवक उपाध्यक्षपदी रवी डाखोरे, मेडशी सर्कल प्रमुखपदी संजय गोडे यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच ‘हर ग्राम शिवसंग्रामचा नारा’ या विषयावर चर्चा करण्यात आली. गाव तिथे शिवसंग्रामची शाखा स्थापन करण्यात यावी, या विषयावर अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित राम बिलेवार, श्रीमण साबळे, नंदू साबळे, अमोल देशमुख, राजू कुटे, नागनाथ गवई, शिवसंग्राम संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.