आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनादेश‎ वाटप:‎बिबट्याच्या हल्ल्यातील ठार‎ पशुधनांच्या नुकसान भरपाईचे वाटप‎

मालेगाव‎16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या‎ पशुधन नुकसान भरपाईपाेटी‎ पशुपालकांना मदत देण्यात आली.‎ रविवारी (दि.५) दाभाडी येथे‎ महाराजस्व अभियानांतर्गत‎ आयाेजित कार्यक्रमात पालकमंत्री‎ दादा भुसे यांच्या हस्ते ९८ हजार ५००‎ रुपयांचे धनादेश वितरित केले.‎ गेल्या वर्षी तालुक्यातील दाभाडी,‎ पिंपळगाव व चिंचवे या भागात‎ बिबट्याने जनावरांना हल्ला केला‎ हाेता.

यात बकऱ्या, गायी, वासरी‎ आदी जनावरांचा मृत्यू झाला हाेता.‎ वन विभागाने पंचनामे करुन‎ मदतीचा अहवाल वरिष्ठांना सादर‎ केला हाेता. या नुसार संबंधित‎ पशुधनपालकांना मदत मंजूर झाली‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ हाेती. रविवारी दाभाडीत महाराजस्व‎ अभियानांतर्गत कार्यक्रमाचे‎ आयाेजन करण्यात आले हाेते. या‎ कार्यक्रमात पालकमंत्री दादा भुसे‎ यांच्या हस्ते सदर पशुपालकांना‎ मदतीचे धनादेश देण्यात आले.‎ शासनाकडून मदत मिळाल्याने‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ पशुपालकांना दिलासा मिळाला‎ आहे.‎ धनादेश वाटपाप्रसंगी प्रातांधिकारी‎ विजयानंद शर्मा, प्रभारी तहसीलदार‎ कैलास पवार, वन परिक्षेत्र‎ अधिकारी वैभव हिरे आदी उपस्थित‎ हाेते.‎

या पशुपालकांना मिळाली मदत‎
दीपक पवार (पिंपळगाव) – १२ हजार, वसंत देवरे (चिंचवे) - ४७ हजार‎ ५००, अशाेक फकिरा काळे (दाभाडी) - ८ हजार, शंकर नारायण निकम‎ (दाभाडी) - २१ हजार, पुंडलिक नारायण निकम (दाभाडी) - १० हजार.‎

बातम्या आणखी आहेत...