आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:आमडोंगरा येथे 48 कुटुंबांना फिरते ड्रम वाटप; वेल्स ऑन व्हिल्स संस्थेने आदिवासी महिलांचा डोक्यावरील भार केला कमी

पेठ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील आमडोंगरा येथे वेल्स ऑन व्हिल्स संस्थेने सामाजिक बांधिलकीतून आदिवासी क्षेत्रातील महिलांच्या डोक्यावरील हंड्याचा भार कमी करण्यासाठी पाण्याचे फिरते ड्रम वाटप केले. उन्हाळयात पाणीटंचाई तालुकाभर तीव्र स्वरुप धारण करते. महिलांना मैलोन मैल डोक्यावर हंडे घेऊन दऱ्या-खोऱ्या ओलांडत पाण्याचा शोध घ्यावा लागतो. महिलांच्या डोक्यावरील हंड्याचा भार हलका व्हावा यासाठी वेल्स ऑन व्हिल्स संस्थेच्या वतीने ४८ कुटुंबाला ड्रम वाटप करण्यात आले.

यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शहा मेनन, प्रकल्प संचालक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प व्यवस्थापक नारायण गभाले, अनुप मोरे, विजय देवरे, रुपेश काळे, वेणूबाई महाले, मीराबाई गायकवाड, जिजाबाई महाले, पारीबाई भोये, यशोदा भडांगे, हिरामण महाले, रोहिदास राऊत, जनार्दन गायकवाड, जनार्दन चौधरी, वामन महाले आदी उपस्थित होते. गावोगावी जलपरिषदेतर्फे देवीदास कामडी हे पाणी समस्यांबाबत विविध संस्थांकडे, शासनस्तरावर पाठपुरावा करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...