आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दप्तराचे मोफत‎ वाटप:डुबेरे विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना दप्तर वाटप‎

सिन्नर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डुबेरे येथील जनता माध्यमिक व‎ उच्च माध्यमिक विद्यालयातील‎ गरजू विद्यार्थ्यांना दप्तराचे मोफत‎ वाटप करण्यात आले. कटारिया‎ वस्त्र भांडारचे संचालक बिपिन‎ कटारिया यांनी ही मदत दिली.‎ यापूर्वी बिपिन यांचे वडील‎ रमणलाल शोभाचंद कटारिया‎ यांनीही शालेय गणवेश व‎ साहित्याची मदत केली होती.‎ उपक्रमशील शिक्षक पी.आर.करपे‎ यांनी ही मदत मिळविण्यासाठी‎‎‎‎‎‎‎‎‎‎ प्रयत्न केले.

करपे हे गरीब, हुशार व‎ होतकरू विद्यार्थ्यांसाठी ‘मदतीचा‎ हात’ हा उपक्रम राबवित आले‎ आहेत.‎ प्राचार्य किशोर जाधव, पर्यवेक्षक‎‎‎‎‎‎‎‎‎‎ अशोक हिंगे, ज्येष्ठ शिक्षक डी.‎ एच. जाधव, बाळासाहेब वारुंगसे,‎ सोमनाथ गिरी, रेखा खंडीझोड,‎ सोमनाथ पगार, राजेंद्र गांगुर्डे,‎ विजय कोकाटे, सुषमा थोरात,‎‎‎‎‎‎‎‎‎‎ राजश्री बोडके आदींच्या हस्ते‎ दप्तराचे वाटप करण्यात आले. पी.‎ आर. करपे यांनी सूत्रसंचालन केले.‎ तर सोमनाथ गिरी यांनी आभार‎ मानले.‎

बातम्या आणखी आहेत...