आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:आदिवासी गरजू विद्यार्थ्यांना स्कूल किट वाटप; सक्षम फाउंडेशनतर्फे मोहपाडा आश्रमशाळेत विधायक उपक्रम

बोरगाव10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोहपाडा (ता. सुरगाणा ) येथील अनुदानित आश्रमशाळेतील आदिवासी गरजू विद्यार्थ्यांना सक्षम फाऊंडेशन, मुंबई यांच्यातर्फे स्कूल किटचे वाटप करण्यात आले.

यावेळी सक्षम फाऊंडेशनचे विश्वस्त सुगम कुलकर्णी, यशोदीप निगुडकर, प्रीती ठाकूर, स्वाती तेलंग आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच नरेंद्र हे दळवी होते. सक्षम फाउंडेशनच्या वतीने शाळेतील गरजू आदिवासी विद्यार्थ्यांना एकूण ४७५ स्कुल किटचे वाटप करण्यात आले. या किटमध्ये विद्यार्थ्यांसाठी स्कूल बॅग, वही, कंपास, बॉक्स, चित्रकला वही, रंग अशा शैक्षणिक साहित्याचा समावेश आहे. यासोबत अवांतर वाचनासाठी ५० पुस्तके शाळेच्या वाचनालयासाठी भेट दिली. शाळेतील उपक्रमशील शिक्षक नामदेव वाजे यांच्या माध्यमातून शाळेतील विविध शैक्षणिक उपक्रमांची दखल फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आली. शाळेच्या विद्यार्थ्यांनी लेझीम व आदिवासी नृत्य सादर करत पाहुण्यांचे स्वागत केले. सुनीता गवळी हिने फाऊंडेशनने केलेली मदत विद्यार्थ्यांसाठी अनमोल व प्रेरणादायी असल्याचे मनोगत व्यक्त केले.शिक्षक नामदेव वाजे यांनी सक्षमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभार मानले. सक्षम फाऊंडेशनचे सुगम कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी जीवनासाठी भाषण-संभाषण कौशल्य महत्त्वाचे असून ते आत्मसात करणे काळाची गरज आहे. त्याचप्रमाणे अभ्यासासोबत कला, क्रीडा, योगासने हे मानसिक, शारीरिक तसेच सामाजिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी अत्यंत गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.

आकर्षक रांगोळी व फलकलेखन शिक्षक मुकेश दोंदे, जयवंती जाधव, शैला हिरे यांनी केले.मुख्याध्यापक संतोष गवळी यांनी प्रास्ताविक केले. या प्रसंगी सुभाष दळवी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भागवत दळवी, पोलिस पाटील पोपट जाधव, प्रदीप बागुल, विजय दळवी यांसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सुत्र संचलन दीपक अहिरे यांनी व आभार प्रदर्शन सतीश शेळके यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी नीलेश बुवा, सुनील कासार, जितेंद्र ठोके, कैलास चौधरी, नवनाथ ठाकरे, योगेश गोवर्धने, हेमंत ठाकरे, कल्पना भोये, सुभाष वळवी यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...