आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेट:तिसऱ्या लोहमार्ग कामाला गती देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा दौरा ; पानेवाडी व पिंपरखेड या रेल्वेस्थानक परिसराला भेट

नांदगाव22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळांतंर्गत येणाऱ्या जळगाव ते मनमाड या तिसऱ्या लाइनच्या लोहमार्गाचे काम संथगतीने सुरू आहे. यामुळे भूसंपादनातील अडथळे दूर करण्यासाठी जिल्हाधिकारी डी. गंगाथरन यांनी नांदगाव तालुक्यातील पानेवाडी व पिंपरखेड या रेल्वेस्थानक परिसराला भेट देऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या. मध्य रेल्वे लोहमार्गावर प्रवासी गाड्यांची वाहतूक वाढल्याने मालवाहतूक करणाऱ्या मालगाड्यांसाठी रेल्वेने भुसावळ ते मनमाड येथे स्वतंत्र तिसरा लोहमार्ग टाकण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीच्या टप्प्यात भुसावळ ते जळगाव येथील तिसऱ्या मार्गाचे काम पूर्ण झाले मात्र. भूसंपादन करताना येणाऱ्या अडचणींमुळे जळगाव ते मनमाड या एकशे साठ किमी महामार्गाचे काम मागील चार वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. गुरुवारी सायंकाळी पिंपरखेड येथील पाहणी दौऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला देण्यासाठी प्रयत्न करू, असे सांगितले. यावेळी येवल्याच्या प्रांताधिकारी ज्योती कावरे, तहसीलदार सिद्धार्थ मोरे, रेल्वेचे उपमुख्य अभियंता सक्सेना तसेच रेल्वे, महसूल विभागातील अधिकारी उपस्थित होते. पिंपरखेड स्थानकाला भेट दिल्यानंतर त्यांनी येथील प्रशासकीय संकुलात अधिकाऱ्यांना आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात महत्त्वाच्या सूचना केल्या. येथील भूमीअभिलेख कार्यालयाने अद्याप प्रशासकीय संकुलात स्थलांतर केले नसल्याने त्यांनी तेथे त्वरित स्थलांतर करावे, असे नमूद केले.

बातम्या आणखी आहेत...