आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासुरगाणा तालुक्यातील चिखली (बोरगाव) येथे ११ ते १८ जूनदरम्यान आठ दिवसीय आंबा महोत्सवाचे उद्घाटन डांगचे जिल्हा विकास अधिकारी डॉ. विपिन गर्ग यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून जव्हारचे आमदार सुनील भुसारा, सापुतारा येथील उद्योजक तुकाराम करडेल, परिवहन अधिकारी उत्तम जाधव, मुख्य पर्यटन प्रशिक्षक मनोज हाडवळे, श्लोका नर्सरीजचे (सातारा) गणेश बाबर, आंबा पिकांचे अभ्यासक जनार्दन वाघेरे होते.
महोत्सव फार्मर प्रोड्युसर कंपनी चिखली यांनी आयोजित केला आहे. सुरगाणा आणि गुजरात मधील केशर आंबा हा जगप्रसिद्ध असल्याने याची प्रचिती अजूनही वाढवी यासाठी हा महोत्सव आयोजिला आहे. हा महोत्सव आठ दिवस चालणार आहे. याप्रसंगी माजी सभापती सुवर्णा गांगोडे, राजू कर्डेल, मनोहर वाघ, अमोल कर्डेल, आनंद पडवळ, प्रताप कर्डेल, हेमंत बागुल, प्रकाश कर्डेल, चंद्रकांत खांडवी, सीमा करडेल, नीलिमा कर्डेल, साप्रो टिमचे कर्मचारी, परिसरातील शेतकरी व महिला उपस्थित होत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.