आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील शिरपूर (जैन) येथील जानगीर महाराज संस्थानाच्या परिसरात ६ ते १० फेब्रुवारी दरम्यान जिल्हास्तरीय ‘कृषी महोत्सव-२०२३’ आयोजित करण्यात आला आहे. कृषी विभाग आणि प्रकल्प संचालक (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी विभाग आणि प्रकल्प संचालक (आत्मा) यांच्या संयुक्त वतीने जिल्हास्तरीय कृषी महोत्सव 2023 चे आयोजन 6 ते 10 फेब्रुवारी 2023 दरम्यान मालेगांव तालुक्यातील शिरपूर (जैन) येथील जानगीर महाराज संस्थान परिसरात करण्यात आले आहे.
कृषी महोत्सवादरम्यान कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये शासकीय संस्था तसेच कृषी क्षेत्रात आधुनिक उत्पादने तयार करणाऱ्या खाजगी कंपन्या प्रगत उत्पादनांचे आणि यंत्राचे सादरीकरण, शेतकरी उत्पादन कंपन्या, शेतकरी गट, महिला स्वयंसहायता बचतगट यांनी उत्पादीत केलेल्या वस्तू, पौष्टीक तृणधान्यांचे खाद्य पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहे.
प्रदर्शनामध्ये प्रत्यक्ष क्षेत्रावर पिक प्रात्याक्षीके, पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी अष्टसुत्री तंत्रज्ञान, धान्य महोत्सव यामध्ये सेंद्रिय शेतमाल विक्री व प्रदर्शन, ट्रॅक्टर, ट्रॅक्टर चलित अवजारे व यंत्रे आदी कृषी अवजारांचे दालन, शेडनेट, पॉलीहाऊस, शेततळे व प्लास्टिक मल्चिंग, तुषार, ठिबक, सुक्ष्म सिंचन व अद्यावत उपकरणे, सोलार कंपाऊंड, सोलार पंप व सोलार हिटर आदी सौरऊर्जा उत्पादने, जैविक व रासायनिक खते, बियाणे व किटकनाशके या कृषी निविष्ठांचे दालन, महिला बचतगटांनी तयार केलेले पौष्टीक तृणधान्य भोजन, महिला बचतगटांमार्फत निर्मित विविध उत्पादनांची विक्री, कृषी व संलग्न विभागाचे, मत्सव्यवसाय, रेशिम उद्योग, कौशल्य विकास विभागाच्या दालनातून विविध योजनांची माहिती या महोत्सवाला भेट देणाऱ्या शेतकऱ्यांना व नागरीकांना मिळणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.