आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबहुजनांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारी समता परिषद ही अग्रेसर विचारधारा असल्याचे प्रतिपादन नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष प्रा. ज्ञानेश्वर दराडे यांनी केले. येथील संपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकी प्रसंगी ते बोलत होते.
नवीन कार्यकारिणी निवडीसंदर्भात चाचपणी करण्यात आली. तसेच इच्छुक कार्यकर्त्यांनी आपापल्या संघटनात्मक कार्याचा आढावा देत नवीन जबाबदारीसाठी अपेक्षा व्यक्त केल्या. यावेळी सचिन सोनवणे, भूषण लाघवे, विशाल परदेशी, योगेश सोनवणे, विष्णुपंत कऱ्हेकर, गोटू मांजरे, ॲड. शंतनू कांदळकर, डॉ. प्रवीण घुले, माजी सभापती प्रकाश वाघ, साहेबराव आहेर, किशोर सोनवणे, राजेश भांडगे, ए. ए. शेख, शशिकांत मोरे, संदीप बोढारे यांनी मनोगत व्यक्त करताना संघटनेच्या प्रचारासाठी विविध संकल्पना मांडल्या. मोहन शेलार, साहेबराव मढवई, राधाकिसन सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. प्रसिद्धिप्रमुख संतोष खैरनार यांनी प्रास्ताविक तर दीपक लोणारी यांनी आभार मानले.
यावेळी ज्ञानेश्वर शेवाळे, भोलानाथ लोणारी, प्रवीण पहिलवान, राजश्री पहिलवान, मुश्रीफ शहा, संतोष परदेशी, मकरंद सोनवणे, रावसाहेब आहेर, सचिन कळमकर, बाळासाहेब दाणे, संपत बोरनारे, विजय खैरनार, विश्वास देवरे, वाल्मीक उंडे, चंद्रकांत कासार, रूपेश घोडके, अजय पावटेकर, राजेंद्र गणोरे, मधुकर साळवे, नंदकुमार सोनवणे, संजय परदेशी, प्रमोद लभडे, सुभाष गांगुर्डे, सुमित थोरात, योगेश तक्ते, प्रदीप भागवत, विकर्ण परदेशी, सचिन भुजबळ, शकील पटेल, ज्ञानेश्वर खैरमोडे, सागर उंडे, प्रकाश बागल, गणेश गवळी, आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.