आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकांचे सहकार्य:मुंगळा येथील त्रासदायक माकड जेरबंद, नागरिकांमध्ये समाधान व्यक्त

मालेगाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील मुंगळा गावांमध्ये गजानन प्रल्हाद अप्पा महाजन रा. मुंगळा यांचे राहते घरामध्ये लाल तोंडी माकडाला पकडण्यात गावकरी लोकांच्या सहकार्याने वन विभागाला यश आले.सदर लाल तोंडी माकडाने मुंगळा गावांमध्ये मागील दोन ते तीन महिन्यापासून गावकऱ्यांना त्रास देणे, घरातील पोळ्या खाणे, अन्नाची नासधूस करणे ,अशा प्रकारचा उन्माद घातला होता. सदर माकडाला पकडण्याकरिता मुंगळा वर्तुळातील वन कर्मचाऱ्यांची टीम मागील तीन महिन्यापासून प्रयत्न करत होती परंतु आज दिनांक 27 रोजी सुहास मोरे मा. वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादे)मालेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली मुंगळा वर्तुळातील अधिकारी व कर्मचारी पी.पी.चौधरी क्षेत्र सहाय्यक, ए.डी.दुर्गे वनपाल तसेच एस.टी.कुटे वनरक्षक, एस. एल. शिंदे वनरक्षक, एम.आर.वाणी वनरक्षक व हंगामी वनमजूर राम पवार, पांडुरंग कालापाड, दत्तात्रय लठाड,प्रताप आडे आणि मुंगळा गावातील गावकरी रामदास वायकर, राजू सोनी, विजय मुळे, संतोष पवार, मनोज तिवाले, हिरामण पवार,गुलाब नरोटे,मुंगळा गावचे पोलीस पाटील व सरपंच व इतर गावकऱ्यांच्या सहकार्याने सदर लाल तोंडी माकड सुखरूप पकडण्यात यश आले तसेच सहकार्याबद्दल वन विभाग मुंगळा यांच्या वतीने गावकऱ्यांचे आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...