आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिसाद:मालेगाव आगाराची दिवाळी; पंधरा दिवसांत एसटीला दीड काेटी उत्पन्न

मालेगाव20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळी हंगाम कॅश करण्याचे नियाेजन यशस्वी ठरल्याने मालेगाव आगार काेट्यधीश बनले आहे. १७ ते ३१ ऑक्टाेबरदरम्यान ४,४३० बसफेऱ्यांमधून तब्बल एक काेटी ६३ लाख ९ हजार ५५६ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. नेहमी सुरक्षित प्रवासाची हमी देणाऱ्या एसटी महामंडळाच्या सेवेला पसंती देत एक लाख ६१ हजार ३८६ प्रवाशांनी लालपरीच्या माध्यमातून सुखरूप प्रवास केला आहे.

काेविड व एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे महामंडळाला माेठा आर्थिक फटका बसला हाेता. हे नुकसान भरून काढण्यासाठी यंदा बसफेऱ्या वाढवून उत्पन्न वाढीचे नियाेजन करण्यात आले हाेते. दैनंदिन ३०० फेऱ्यांव्यतिरिक्त ६० अतिरिक्त फेऱ्या वाढविण्यात आल्या हाेत्या. पुणे, नाशिक व पाचाेरा मार्गांवर फेऱ्यांची संख्या वाढवत गर्दी लक्षात घेऊन इतरही मार्गांवर वाढीव फेऱ्या करण्यात आल्या. नियाेजनानुसार १७ ऑक्टाेबरपासून पाचाेरा व नाशिक मार्गांवर दरराेज प्रत्येकी दहा बसफेऱ्या सुरू हाेत्या.

दिवाळीनिमित्त गावी परतणारे नागरिक व भाऊबीजेसाठी जाणाऱ्या माहेरवाशिणींच्या गर्दीमुळे आगाराच्या उत्पन्न वाढीला माेठा हातभार लागला आहे. दिवाळीच्या सुट्ट्या दाेन दिवसांत संपणार असल्याने नागरिकांची परतीच्या प्रवासासाठी गर्दी हाेणार आहे. त्यामुळे वाढीव बस सुविधा १६ नाेव्हेंबरपर्यंत कायम ठेवली जाणार आहे.

प्रवासी साेयीनुसार फेऱ्या
आगाराने पुणे, पंढरपूर, साेलापूर, चाेपडा, अहमदनगर, नाशिक, पाचाेरा व शिर्डी मार्गांवर फेऱ्या करत ३ लाख २८ हजार ९९ किलाेमीटरचे अंतर पूर्ण केले आहे. प्रवाशांच्या साेयीसाठी पुणेसाठी पहाटे साडेपाच व सकाळी साडेसात वाजता दाेन बसेस साेडल्या जात आहेत. पंढरपूर, साेलापूर, नगर, चाेपडा, नाशिक व पाचाेऱ्यासाठी रात्रीच्या सत्रातही बस सुरू ठेवल्या आहेत.

कर्मचाऱ्यांचे माेठे याेगदान
उत्पन्न वाढीत चालक, वाहक व यांत्रिकी कर्मचाऱ्यांचे माेठे याेगदान आहे. वरिष्ठांच्या नियाेजनाची प्रभावी अंमलबजावणी करत प्रवासी व उत्पन्न वाढीसाठी सर्वांनी मेहनत घेतली. पुढील दाेन आठवडे वाढीव फेऱ्या कायम राहणार असल्याने उत्पन्नात अजून वाढ अपेक्षित आहे.- किरण धनवटे, आगारप्रमुख मालेगाव

बातम्या आणखी आहेत...