आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्साहात मिरवणूक पार:सिन्नरला परवानगीविनाच मिरवणुकीत डीजेचा दणदणाट ; पारंपरिक देखाव्यांसह आदिवासी, पौराणिक नृत्य

सिन्नर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील मुख्य मिरवणूक आठ तास चालली. पारंपरिक देखाव्यांसह आदिवासी, पौराणिक नृत्य लक्षवेधी ठरले. तर डीजेचा दणदणाटही मिरवणुकीत होता. दोन वर्षांनंतर विसर्जन मिरवणूक काढण्याची संधी गणेश मंडळांना मिळाल्याने कार्यकर्त्यांनी अमाप उत्साहात मिरवणूक पार पाडली.

दुपारी साडेचार वाजता गंगा वेस येथून मिरवणुकीला आमदार माणिकराव कोकाटे, माजी आमदार राजाभाऊ वाजे, युवानेते उदय सांगळे यांच्या हस्ते सुरुवात झाली. शिवसेना तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर गाडे, शहरप्रमुख गौरव घरटे, माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, माजी नगरसेवक प्रमोद चोथवे, मनोज भगत, विजय जाधव, अशोक जाधव, उदय गोळेसर, बाळासाहेब गाडे, सुनील खोळंबे, राहुल भावसार, किशोर लहांमगे, देवा सांगळे, नामदेव कोतवाल, ॲड. एन. एस. हिरे, विष्णू अत्रे, राजेंद्र वंजारी आदी उपस्थित होते. शहरातील लाल चौक, शिंपी गल्लीमार्गे गणेश पेठ, छत्रपती शिवाजी चौकापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. मध्यरात्री साडेबारा वाजता मिरवणुकीची सांगता झाली.

बातम्या आणखी आहेत...