आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिवर्तन:न्यायडोंगरी विकास सोसायटीवर शिवसेवा पॅनलचे वर्चस्व; माजी आमदार अनिल आहेर यांच्या समता पॅनलचा पराभव

नांदगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यायडोंगरी विविध कार्यकारी विकास सोसायटीच्या निवडणुकीत माजी पंचायत समिती सदस्य शशिकांत मोरे व बाजार समितीचे माजी सभापती विलास आहेर यांच्या शिवसेवा परिवर्तन पॅनलने माजी आमदार अनिल आहेर, महिला व बालकल्याण समिती सभापती अश्विनी आहेर यांच्या समता पॅनलचा १२ विरुद्ध १ अशा मताधिक्याने दणदणीत पराभव करत सोसायटीवरील सत्ताधारी आघाडीची सत्ता उलथवून लावत परिवर्तन घडवून आणले. समता पॅनलचे मधुकर शंकर आहेर हे एकमेव उमेदवार सर्वसाधारण प्रवर्गातून निवडून आले.

जिल्हा परिषदेच्या गत निवडणुकीत न्यायडोंगरी गावात शिवसेनेचे दोन गट पडल्याने येथून शिवसेना उमेदवाराला पराभव पत्करावा लागला होता. कृषी मंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे यांनी गावातील माजी पंचायत समिती सदस्य शशिकांत मोरे व माजी सभापती विलास आहेर यांच्यात यशस्वी मध्यस्थी करत दिलजमाई घडवून आणल्याने शिवसेनेला मानणाऱ्या मतदारांची संभाव्य फूट रोखण्यात यश आले. शिवसेवा परिवर्तन पॅनलने सोसायटीवर निर्विवाद वर्चस्व राखले.

बातम्या आणखी आहेत...