आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनजागृती:डॉ. बीडकर काॅलेजमध्ये एड‌्सदिनी पाेस्टर स्पर्धा ; डॉ. दीपक बहिरम यांचे झालेव्याख्यान

अभोणा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डॉ. विजय बीडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग, रेड रिबन क्लब आणि ग्रामीण रुग्णालय अभोणा यांच्या वतीने जागतिक एड्सदिनी झाडॉ. दीपक बहिरम यांचे व्याख्यान झाले.

एड्स जनजागृती पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले हाेते. २५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यात जय जाधव (प्रथम), किशोर कोल्हे (द्वितीय), गायत्री चव्हाण (तृतीय) आले. परीक्षक म्हणून दीपक जाधव, आनंद जाधव आणि भीमराज हाडस यांनी काम केले. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक बहिरम यांनी विद्यार्थ्यांना एड्स जनजागृतीविषयक मार्गदर्शन केले. प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी डॉ. डी. जे. नेरपगार यांनी केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. रवींद्र पगार होते. प्रा. बी. जी. बोरसे यांनी आभार मानले. त्याप्रसंगी प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...