आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:डॉ. नाईकवाडी कॉलेजची फार्मा कंपनीत इंडस्ट्रियल व्हिजिटच; साईटेक ला भेट देत जाणून घेतली प्रक्रिया

सिन्नरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रात्यक्षिकान कृतियुक्त शिक्षण मिळावे या उद्देशाने जामगाव येथील डॉ. नाईकवाडी फार्मसी मेडिकल कॉलेजच्या वतीने विद्यार्थ्यांना इंडस्ट्रियल सफर घडविण्यात आली. मुसळगाव येथील साईटेक या फार्मा कंपनीत जात विद्यार्थ्यांनी तेथील उत्पादन प्रक्रिया समजावून घेतली.

मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील साईटेक स्पेशालिटी प्रायव्हेट‌ लिमिटेड येथे डॉ. नाईकवाडी कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी ‘इंडस्ट्रियल व्हिजिट’ उपक्रमांतर्गत ही भेट दिली. बी. फार्मसी अंतिम वर्षातील ५५ विद्यार्थ्यांसमवेत दाेन शिक्षक प्रतिनिधी यावेळी सोबत होते. फार्मा कंपनीत कच्चामाल कुठून येतो, त्यावरच प्रक्रिया कशी केली जाते, उत्पादन नेमकी कशा प्रकारे घेतले जाते, पॅकिंगसाठी कुठल्या यंत्रांचा वापर केला जातो, उत्पादनांचा प्रवास विक्रेता आणि नंतर थेट ग्राहकांपर्यंत कसा होतो. मानव संसाधन विभागाचे कामकाज कसे चालते यासह विविध प्रक्रिया विद्यार्थ्यांनी या कारखान्यात जात समजावून घेतल्या. क्लासरूम शिक्षण घेत असताना इंडस्ट्रीमधील सुरू असलेल्या प्रक्रियांशी विद्यार्थी समरूप व्हावेत, असा उद्देश या इंडस्ट्रियल व्हिजिट मागे असल्याचे यावेळी डीन व प्राचार्य प्रा. एस. एस. डेंगळे यांनी सांगितले. कंपनीचे सीनियर एचआर मॅनेजर चैतन्य बोरावके यांचे आभार मानले. प्रा. एम. बी. दातीर व प्रा. एम. जे. परदेशी यांनी सत्कार केला. पुस्तकी ज्ञानासोबतच प्रत्यक्ष कृतियुक्त शिक्षण महत्त्वाचे असते, हे इंडस्ट्रियल व्हिजिटमुळे अनुभव आल्याचे विद्यार्थ्यांनी यावेळी सांगितले.०

बातम्या आणखी आहेत...