आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायुवकांनो विद्यार्थिदशेतच स्वप्न पहा, ध्येयाने कार्यरत रहा. आपले स्वप्न पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रत्येक दिवसाची सकारात्मक विचाराने सुरुवात करा. सकारात्मक विचार असणाऱ्या लोकांच्या सहवासात रहा. या छोट्या गोष्टी तुमच्यामध्ये नक्कीच मोठे सकारात्मक विचार रुजवतील अन् तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करता येतील, असे प्रतिपादन नाशिक येथील बीएसएनएलचे सहायक महाव्यवस्थापक अविनाश पाटील यांनी केले.
बाभूळगाव येथील एस. एन. डी. अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन केंद्रामध्ये आयोजित माजी विद्यार्थी मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जगदंबा शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी लक्ष्मण दराडे, प्राचार्य डॉ.डी.एम.यादव आदींच्या हस्ते सरस्वती पूजन तसेच दीपप्रज्वलन करण्यात आले.
प्राचार्य डॉ.डी.एम.यादव म्हणाले की, महाविद्यालयाच्या जडणघडणीत तसेच वाटचालीत महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. आमचे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे. माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सचिन सावंत यांनी संघटनेच्या कार्यकारी मंडळाची ओळख करून दिली व विविध उद्दिष्टे सांगितली. २०१० पासूनचे १०० हून अधिक माजी विद्यार्थी- विद्यार्थिनी आणि आजी-माजी शिक्षकांनी मेळाव्यास उपस्थिती दर्शवत प्रेम व्यक्त केले.
अमोल बर्डे, संजना बाबर, गायत्री दिघे, शशिकांत दुगड या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. स्थापत्य विभागप्रमुख डॉ. यू. एस.अन्सारी, मेकॅनिकल विभागप्रमुख डॉ. हरजीत पवार, अरविंद घोडके, दत्तात्रय क्षीरसागर, जयंत केंगे, शुभम शिंदे, संगणक विभागप्रमुख डॉ. उमेश पवार, एमबीए विभागप्रमुख डॉ. व्ही. एन. उबाळे, माहिती तंत्रज्ञान विभागप्रमुख प्रा. पी. पी. रोकडे, इलेक्ट्रिकल विभाग प्रमुख डॉ. पी. सी. टापरे आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.