आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू:बिबट्याच्या हल्ल्यात वाहनचालक गंभीर जखमी

सिन्नर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नायगावजवळ शुक्रवारी (दि. २९) सकाळी साडेसहा वाजता एका दुचाकीस्वारावर बिबट्याने हल्ला करत जखमी केले. दुचाकीस्वाराच्या मानेला व दंडाला जखमा झाल्या असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सिन्नर तालुक्यातील नायगाव येथील सोमनाथ मार्तंड वाबळे (४०) हे शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास दुचाकीवरून निघाले असता, यावेळी बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी सोमनाथ हे दुचाकीवर खाली पडले, मात्र यावेळी बिबट्याने धूम ठोकली, परंतु, सोमनाथ यांच्या मानेवर व खांद्यावर बिबट्याच्या दात आणि नखांमुळे जखमा झाल्या आहे. ,

जखमींच्या आर्थिक मदतीसाठी प्रस्ताव
बिबट्याने हल्ला केलेल्या व्यक्तीला आर्थिक मदत व्हावी यासाठी शासकिय नियमानुसार वरीष्ठांकडे प्रस्ताव देणार आहे. बिबट्याच्या शोधासाठी कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.- मनीषा जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी, सिन्नर

बातम्या आणखी आहेत...