आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाेन दिवसांची पाेलिस काेठडी:नशेच्या औषधांची विक्री,दाेघांना सुरतमधून अटक; पोलिस उपअधीक्षक खांडवी यांची माहिती

मालेगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नशेच्या बेकायदा औषधे विक्रीप्रकरणी पाेलिसांनी सुरत शहरातून दाेघांना अटक केली आहे. सुरेश हंसाराम चाैधरी व शरद लक्ष्मण बाेरसे अशी संशयितांची नावे आहेत. यातील एक संशयित इम्रान माेटवा फरार असून त्याचा शाेध सुरू आहे. अटकेतील दाेघा संशयितांना न्यायालयाने दाेन दिवसांची पाेलिस काेठडी सुनावल्याची माहिती अपर पाेलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी दिली.अॅलप्राझाेलम गाेळ्या (कुत्ता गाेली) काेरेक्स खाेकल्याच्या औषधांचा नशेसाठी वापर हाेत आहे. बरेच तरुण या गुंगीकारक व नशा आणणाऱ्या औषधांच्या आहारी गेले आहे. नशेखाेरीतून गुन्हेगारी वाढत असल्याने पाेलिसांनी या बेकायदा औषध विक्रीवर धडक कारवाया सुरू केल्या आहेत. गेल्या महिन्यात विशेष पथकाने जुना आग्रा राेडवर छापा टाकून संशयित मुख्तार अहमद माेहंमद अरमान याला ताब्यात घेतले हाेते. त्याच्याकडून ८७ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला हाेता.

चाैकशीत चाेरट्या औषध विक्रीचे सुरत कनेक्शन समाेर आल्याने एक पथक तपासकामी सुरतला पाठविण्यात आले हाेते. पाेलिस उपनिरीक्षक अनिल पठाडे, पाेलिस कर्मचारी अश्पाक शेख, रवी काळे व अमाेल शिंदे यांनी गाेडादरे भागातून मेडिकल चालक सुरेश चाैधरी याला अटक केली. या धंद्यात दलाली करणाऱ्या शरद बाेरसे यालाही ताब्यात घेतले. दाेघांना न्यायालयात हजर करण्यात आले हाेते. साेमवारी दाेघांच्या पाेलिस काेठडीची मुदत संपणार असून त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. या गुन्ह्यात आत्तापर्यंत तिघांना अटक झाली आहे. फरार माेटवालाही लवकरच अटक केली जाईल असे खांडवी यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...