आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीका‎:निर्यातबंदीच्या निर्णयानेच‎ कांद्याला मिळेना रास्त भाव‎

पिंपळगाव बसवंत‎23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकरीवर्गाने आता बोलले पाहिजे,‎ बोलले नाही तर खूप वाईट परिस्थिती‎ येईल. महाराष्ट्रात जेवढा कांदा‎ पिकतो, त्याचा अर्ध्याहून अधिक‎ कांद्याचे उत्पादन नाशिक जिल्ह्यात‎ हाेते. मात्र, केंद्र सरकारने निर्यात बंदी‎ केल्यामुळे मोठी समस्या निर्माण‎ झाली असून दुसऱ्या देशात कांदा‎ जाऊ नये यासाठी केंद्र सरकार दुटप्पी‎ भूमिका घेत असल्याची टीका‎ आमदार दिलीप बनकर यांनी केली.‎

पिंपळगाव बाजार समितीच्या‎ आवारात कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी‎ त्यांनी चर्चा केली. आमदार बनकर‎ म्हणाले, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना‎ चांगला भाव मिळावा यासाठी केंद्र‎ सरकारकडे मागणी केली आहे.‎ नाफेडने कांदा खरेदी करावा मात्र‎ त्यासाठी व्यापाऱ्यांपेक्षा अधिक भाव‎ दिला पाहिजे. तसेच बाजार समितीत‎ येऊन कांदा खरेदी करावा, त्यामुळे‎ स्पर्धा वाढेल. नाशिक जिल्ह्यातील‎ शेतकऱ्यांच्या व्यथा विधिमंडळात‎ मांडल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.‎ राज्य शासनाच्या अनुदानातून ५००‎ रुपये क्विंटल भाव द्यावा. शेतकऱ्यांनी‎ एकत्र येऊन सरकारला प्रश्न केला‎ पाहिजे. केंद्राला अनुदान देण्यासाठी‎ भाग पडणार असल्याचे आश्वासनही‎ त्यांनी यावेळी दिले. कांद्याला‎ बाहेरच्या देशात मोठी मागणी होती‎ मात्र केंद्र सरकारच्या चुकीच्या‎ धोरणामुळे कांद्याला मोठे नुकसान‎ झाले असल्याचे त्यांनी सांगितले.‎

बातम्या आणखी आहेत...