आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीक भुईसपाट:वारा व पावसामुळे शिंगवे येथे बाजरीचे पीक भुईसपाट

मनमाड, चांदवड6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी आश्लेषा नक्षत्राच्या पावसाने दमदार पुनरागमन केले. तर शिंगवे परिसरात बाजरीचे पीक पावसामुळे भुईसपाट झाले. शुक्रवारी दुपारी १२.३० च्या सुमारास पावसाला सुरुवात झाली.

तब्बल तासभर जोरदार पाऊस झाला. काही वेळाच्या विश्रांतीनंतर पुन्हा पाऊस सुरू हाेता. शिंगवे परिसरात जोरदार वारे व पाऊस यामुळे बाजरीची पिके आडवी पडली. त्यामुळे बाजरी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...