आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:मनेगावी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जन

मनेगाव24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जय हरी ज्येष्ठ नागरिक संस्था, ग्रामपंचायत व वृक्षमित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जन उपक्रमाला प्रतिसाद मिळाला. गावातील ३०० पैकी ५८ कुटुंबांनी यात सहभाग घेतला. सरपंच संगीता शिंदे, उपसरपंच श्रीराम सोनवणे, ज्येष्ठ नागरिक संस्थेचे अध्यक्ष ॲड. सी. डी. भोजने यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली.

आटकवडे येथील प्रगतिशील शेतकरी रंगनाथ वाघ यांच्या गणरायाचे पूजन करून सुरुवात झाली. ज्येष्ठ नागरिक संस्थेचे सरचिटणीस मधुकर पवार, मच्छिंद्र सोनवणे, विठ्ठल आंबेकर, बाजीराव सोनवणे, बजरंग सोनवणे, पांडुरंग सोनवणे, बाळू जाधव, राजाराम शिंदे, सुकदेव सोनवणे, हरिभाऊ सोनवणे, योगेश शिंदे, ग्रामसेवक एम. बी. यादव, ग्रामपंचायत सदस्य अर्जुन सोनवणे, सदस्या शोभा भालेराव, वृक्षमित्र सुरेश कपिले, सुनील शिवाजी शिंदे आदी उपस्थित होते. सहा वर्षे पिण्याच्या पाण्याची परवड झाली होती. शेतीही तोट्यात होती. या वर्षी परतीच्या पावसाने सर्व तलाव भरून वाहिले आहेत. पाण्याच्या एक-एक घोटासाठी ग्रामस्थांनी संघर्ष केलेला असल्याने पाण्याचे मोल समजल्याने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जन करण्याचा निर्णय घेण्यात आला.ग्रामपंचायत, ज्येष्ठ नागरिक, वृक्षमित्र परिवाराने पुढाकार घेत सर्व गणेश मंडळ, ग्रामस्थांना आवाहन केले होते. गणेश विसर्जनासाठी गावात कृत्रिम कुंड, निर्माल्यासाठी ट्रॅक्टर ठेवण्यात आला होता. पोलिसपाटील रवींद्र सोनवणे यांनी उपक्रम शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...