आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी मागणीवर ठाम:बाेरी-अंबेदरीच्या आंदाेलनकर्त्यांना वनविभागाकडून हटविण्याचा प्रयत्न

मालेगाव11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाेरी अंबेदरी धरणाच्या बंदिस्त कालवे कामाच्या निषेधार्थ स्थानिक शेतकऱ्यांनी पुकारलेले आंदाेलन राेखण्याचे प्रशासनाकडून खटाटाेप सुरू झाला आहे. मंगळवारी (दि. २२) सकाळी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदाेलनस्थळी जावून आंदाेलकांना हटविण्याचा प्रयत्न केला. कुठलीही परवानगी न घेता वन क्षेत्रात आंदाेलन हाेत असल्याचा ठपका ठेवण्यात आला. मात्र, आंदाेलकांनी दाद न देता आपले आंदाेलन कायम ठेवले आहे.

कालवे बंदिस्त न करता पाटचारीद्वारे पारंपारिक पद्धतीने पाण्याचे वितरण व्हावे या मागणीसाठी शेतकऱ्यांचे दाेन आठवड्यापासून आंदाेलन सुरू आहे. कुठलाही ठाेस निर्णय हाेत नसल्याने शेतकऱ्यांनी बैलगाडी माेर्चा काढण्यासह पालकमंत्र्यांच्या कार्यालयात आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. आंदाेलकांना राजकीय पाठबळ मिळू लागल्याने आंदाेलन वेगळ्या वळणावर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दुसरीकडे बंदिस्त कालवा कामाच्या समर्थनार्थ झाेडगे भागातील नागरिकही आक्रमक झाले आहे. एकंदर परिस्थिती पाहता आंदाेलन थांबविण्यासाठी प्रशासकीय हालचाली गतीमान झाल्याचे चित्र आहे. वन अधिकाऱ्यांनी मंगळवारी आंदाेलनस्थळी जावून आंदाेलकांना वन क्षेत्रात आंदाेलन न करण्याची तंबी दिली. कुठलीही परवानगी न घेता सुरू केलेले आंदाेलन बेकायदा असल्याचे स्पष्ट केले. आंदाेलक शेतकऱ्यांनी दाेन दिवसांत तहसीलदारांकडून रितसर परवानगी घेवू. मागणी मान्य हाेत नाही ताेपर्यंत येथून हटणार नाही असा, पवित्रा घेतला आहे.

तालुका पाेलिसांचे वनविभागाला पत्र
राजकीय दबावामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांची धावपळ हाेत आहे. तालुका पाेलिसांनी वनविभागाला पत्र देत परवानगी नसताना आपल्या हद्दीत आंदाेलन कसे सुरू आहे याची विचारणा केली आहे. पाेलिसांचे पत्र हाती पडताच वन अधिकारी फाैजफाट्यासह आंदाेलनस्थळी दाखल झाले. आंदाेलक शेतकरी आक्रमक असल्याने वनविभागाने मवाळ भूमिका घेत २ वनपरिमंडळ अधिकारी व ५ वनरक्षकांचा बंदाेबस्त तैनात केला आहे.

बातम्या आणखी आहेत...