आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अविरोध:सरदवाडी सोसायटीच्या संचालक मंडळाची निवडणूक अविरोध; आमदार कोकाटे गटाचे वर्चस्व, एक जागा रिक्त

सिन्नर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

​​​​​तालुक्यातील सरदवाडी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत १३ पैकी १२ जागा अविरोध करत आमदार माणिकराव कोकाटे गटाने आदर्श पायंडा पाडला आहे. अनुसूचित जाती जमाती गटात एकही अर्ज न आल्याने ही जागा रिक्त राहिली.

सर्वसाधारण गटात लीलाबाई ज्ञानेश्वर कटाळे, केरू वाळीबा ढोली, रामनाथ गेणू ढोली, हरी लक्ष्मण शेळके, पुंडलिक नामदेव शिरसाठ, गणपत रामभाऊ शिरसाठ, विलास रामचंद्र शिरसाठ, सुरेश सहादू शिरसाठ या आठ जणांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. महिला राखीव गटात जिजाबाई रंगनाथ शिरसाठ, मीराबाई बाळासाहेब शिरसाठ, तर इतर मागासवर्गीय गटात नितीन पोपट शिरसाठ, भटक्या विमुक्त जातीजमाती गटात विठ्ठल नाना आव्हाड यांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. छाननीत सर्वांचे अर्ज वैध ठरल्याने आणि प्रत्येक जागेवर एकच अर्ज दाखल झाल्याने सर्व उमेदवारांची अविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी व्ही. बी. नढे यांनी केली.

निवडीनंतर गुलालाची उधळण करत समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला. याप्रसंगी सरपंच रत्ना शिरसाठ, दिलीप शिरसाठ, रामहरी शिरसाठ आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...