आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:गुंजाळनगरच्या सरपंचपदी गायकवाड यांची निवड

देवळा25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवळा तालुक्यातील गुंजाळनगरच्या सरपंचपदी शरद गायकवाड तर उपसरपंचपदी विनोद आहेर यांची निवड करण्यात आली.गुंजाळनगर ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत ग्रामविकास पॅनलसमोर नीलेश गुंजाळ, विवेक गुंजाळ, प्रवीण गुंजाळ या युवकांनी एकत्रित येत प्रत्येक प्रभागात उमेदवार उभे करत कडवे आव्हान उभे केले होते. यामध्ये अकरापैकी सहा जागांवर त्यांनी विजय संपादन करत सत्ता प्राप्त केली तर ग्रामविकास पॅनलला पाच जागांवर समाधान मानावे लागले होते.

सरपंच व उपसरपंच निवडीसाठी गुरुवारी सकाळी १० वाजता निवडणूक निर्णय अधिकारी व्ही. जे. पवार यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात नूतन सदस्यांची बैठक झाली. निर्धारित वेळेत सरपंचपदासाठी शरद नानाजी गायकवाड व सुनील बारकू पगारे यांचे दोन उमेदवारी अर्ज तर उपसरपंचपदासाठी विनोद पुंडलिक आहेर व तुषार गुंजाळ यांचे दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी दोन उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात आले होते. अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत सरपंचपदासाठी शरद गायकवाड यांना अकरापैकी सहा तर सुनील पगारे याना पाच मते व उपसरपंचपदासाठी विनोद आहेर यांनाही अकरापैकी सहा तर तुषार गुंजाळ यांना पाच मते मिळाल्याने सरपंचपदी शरद गायकवाड तर उपसरपंचपदी विनोद आहेर यांची निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केले.

नूतन पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करीत जल्लोष केला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य शंकर वाघ, गंगूबाई सोनवणे, जिजाबाई गांगुर्डे, कमळाबाई माळी, आशाबाई जाधव, शीतल गुंजाळ, स्वाती गुंजाळ आदी उपस्थित होते. यावेळी डॉ राजेंद्र गुंजाळ, अनिल गुंजाळ, दिगंबर गुंजाळ, नीलेश गुंजाळ, प्रवीण गुंजाळ,विवेक गुंजाळ, हिरामण गांगुर्डे, सागर जाधव, शांताराम गुंजाळ, मुन्ना धोंडगे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...