आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:सुरगाण्यातील 60 ग्रामपंचायतींत उपसरपंचपदाची निवड शांततेत

बोरगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सुरगाणा तालुक्यातील ६१ ग्रामपंचायतींच्या उपसरपंचपदासाठी मंगळवारी (दि. १) निवडणूक घेण्यात आली. मात्र, आंबाठा येथे ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित नसल्याने उपसरपंचपदाची निवडणूक स्थगित करण्यात आली.

यात काही ठिकाणी अविराेध निवड झाली तर काही ठिकाणी गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात आले. अनेक ठिकाणी हात उंचावून मतदान घेण्यात आले. उपसरपंचपदाच्या निवडणुकीप्रसंगी अनुचित प्रकार घडू नये यासाठी सात पोलिस अधिकारी, ४८ पोलिस कर्मचारी, एक आरसीपी प्लाटून यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

ग्रामपंचायत व उपसरपंचपदी निवड
झालेले सदस्य असे...
घोंडाबे : संदीप गांगुर्डे (अविरोध), बोरगाव : हिरामण भोये, साजोळे : पुष्पा गांगुर्डे, हतगड : जानू बागूल (अविरोध), हट्टी : विजय देशमुख, म्हैसखडक : हरिदास गायकवाड (अविरोध), शिंदे दि. : रामचंद्र भोये, माणी : रमेश वाघमारे, हेमाडपाडा : चंद्रकला पिठे (अविरोध), काठीपाडा : प्रमिला जाधव (अविरोध), नागशेवडी : पंढरीनाथ गांगुर्डे (अविरोध), हरणटेकडी : भास्कर पवार (अविरोध), सराड : अनिल गायकवाड (अविरोध), रोकडपाडा : गोविंद भोये (अविरोध), आंबोडे : दमयंती चौधरी, भवाडा : रामा महाले (अविरोध), डोल्हारे : निर्मला पाडवी (अविरोध), भदर : एकनाथ चौधरी (अविरोध), बाऱ्हे : छबीबाई वार्डे (अविरोध), मोहपाडा : विजय दळवी (अविरोध), बुबळी : सचिन पवार (अविरोध), पोहाळी : वैशाली गायकवाड, राहुडे : वाल्मीक पिठे (अविरोध).

बातम्या आणखी आहेत...