आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैसा अन् वेळेचा अपव्यय टळला:देशमाने खुर्द येथील सिद्धेश्वर सोसायटीची निवडणूक अविरोध; ग्रामस्थांनी एकत्र येत घेतला पुढाकार

येवला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील देशमाने खुर्द येथील सिद्धेश्वर विविध कार्यकारी सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक अविरोध झाली. ग्रामस्थांनी एकोप्याने येऊन निवडणूक अविरोध करण्यासाठी पुढाकार घेतला होता.

यासाठी बाजार समितीचे माजी सभापती रतन काळे, माजी अध्यक्ष भागवत राठोड, सुदाम गांगुर्डे, विठ्ठल जाधव, रतन गोसावी, ग्रामपंचायत सदस्य बापूसाहेब काळे, राष्ट्रवादी सरचिटणीस योगेश गांगुर्डे, प्रभाकर जगताप, सिद्धिविनायक ट्रस्टचे प्रवीण तळेकर, भास्कर भालके, कैलास जगताप, चंद्रकांत पवार, अनिल औटी, साहेबराव शिंदे यांनी प्रयत्न केले. नवनिर्वाचित संचालकपदी रतन काळे, विठ्ठल जाधव, सुदाम गांगुर्डे, भास्कर भालके, रामकृष्ण पवार, माधव काळे, सोन्याबापू दुगड, पुंडलिक शिंदे, ठकूबाई सोपान आरगडे, जनाबाई रंगनाथ बागल, नानासाहेब शिंदे, रतनगिरी गोसावी, किशोर वाघ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी जाधव, सहायक निवडणूक अधिकारी जगताप व संस्था मदतनीस सोपान हराळे यांनी निवडीचे कामकाज पाहिले.

बातम्या आणखी आहेत...