आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपात्र घोषित:याेजनांच्या  निधीचा अपहार; खैरगव्हाणचे सरपंच अपात्र

येवलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

खैरगव्हाण येथील सरपंच माणिक चंद्रभान सावंत यांनी विविध योजनांचा निधी धनादेशाद्वारे स्वतःच्या नावाने काढल्याचे सिद्ध झाल्याने मालेगावच्या अपर जिल्हाधिकारी मायादेवी पाटोळे यांनी सरपंच सावंत यांस उर्वरित कालावधीसाठी अपात्र घोषित केले आले आहे.सरपंच माणिक सावंत यांनी ग्रामपंचायतीच्या कारभारात मनमानीपणाने कामकाज करत ग्रामनिधी, चौदावा वित्त आयोग, ग्रामीण पाणीपुरवठा इत्यादी खात्यांतील ३८ हजारांच्या निधीची रक्कम इतरांना विश्वासात न घेता वेगवेगळ्या कामांचा खर्च दाखवून परस्पर ग्रामसेवकाशी संपर्क साधून स्वतःच्या नावे धनादेशाद्वारे काढून घेतली.

हीच बाब विरोधी गटातील ग्रामपंचायत सदस्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे १५ सप्टेंबर २०२१ ला ग्रामपंचायत अधिनियम१९५८ चे कलम १४ (ग) अन्वये विवाद अर्ज दाखल केला होता, सरपंच सावंत यांच्यावर गटविकास अधिकारी यांनी देखील जिल्हा परिषद प्रशासनाकडे ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९ (१) नुसार कारवाई प्रस्तावित आहे. त्यातच सरपंच माणिक सावंत यांचे सदस्यपद उर्वरित कालावधीसाठी अपात्र घोषित केले.

बातम्या आणखी आहेत...